JobSetu वापरण्यापूर्वी कृपया खालील अटी काळजीपूर्वक वाचा. आमचं व्यासपीठ वापरणं म्हणजे तुम्ही या अटींना संमती देत आहात.
JobSetu हे लातूर जिल्ह्यातील Job Seekers व Companies यांना एकमेकांशी जोडणारं व्यासपीठ आहे. आम्ही केवळ संपर्काची सोय (जोडणी) उपलब्ध करून देतो — प्रत्यक्ष नोकरी देणे, मुलाखत घेणे, निवड करणे हे संबंधित Company च्या अखत्यारीत आहे.
JobSetu वर आकारले जाणारे सदस्यत्व शुल्क (Job Seeker साठी ₹99, Company साठी ₹200) हे प्लॅटफॉर्म चालवण्याच्या किमान खर्चासाठी घेतले जाणारे नाममात्र (token) शुल्क आहे — यातून कोणताही नफा कमावण्याचा उद्देश नाही.
JobSetu कोणत्याही उमेदवाराला नोकरी मिळेलच याची हमी देत नाही. सदस्यत्व शुल्क हे फक्त व्यासपीठ वापरण्याच्या संधीसाठी आहे, निकालाची हमी नाही.
नोंदणी करताना Job Seeker व Company यांनी दिलेली माहिती खरी असावी. चुकीची/खोटी माहिती आढळल्यास Admin कडून खाते ब्लॉक/काढून टाकले जाऊ शकते.
कोणतीही Company किंवा Job Seeker यांचे खाते मंजूर/नाकारणे, ब्लॉक करणे, किंवा काढून टाकणे हे सर्वस्वी Admin च्या विवेकाधीन आहे.
प्रश्न किंवा तक्रारींसाठी: support@myjobsetu.in · +91 9404180011 (सकाळी 10:00 — रात्री 8:00)